वृत्तसंस्था / नॉटिंगहॅम
एफए चषक फुटबॉल स्पर्धेत नॉटिंगहॅम फॉरेस्ट संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी अटितटीच्या सामन्यात इप्सविच क्लबचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. या सामन्यात निर्धारित 90 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. त्यानंतर जादावेळेत पुन्हा ही कोंडी कायम राहिल्याने पेनल्टीचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये नॉटिंगहॅम फॉरेस्टतर्फे पाचही फटक्यावर गोल नोंदविले गेले. दरम्यान नॉटिंगहॅम फॉरेस्टचा गोलरक्षक जॅक टेलरने इप्सविचचे दोन फटके अडविल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले.









