Charls Shobharaj : नेपाळच्या (Nepal) सर्वोच्च न्यायालयाने फ्रेंच सीरियल किलर चार्ल्स शोभराज () याला त्याच्या वाढत्या वयाचा विचार करून १९ वर्षांच्या तुरुंगवासानंतर सोडण्याचे आदेश दिले आहेत. दोन अमेरिकन पर्यटकांची हत्या केल्याच्या आरोपाखाली चार्ल्स 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात आहे. या संबंधीची माहिती एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने दिली आहे.
भारतीय आणि व्हिएतनामी वंशाचा फ्रेंच नागरिक चार्ल्स शोभराज हा कुख्यात सिरीयल किलर असून तो सध्या नेपाळमध्ये आपली शिक्षा भोगत आहे. 1975 ला नेपाळमध्ये बनावट पासपोर्ट वापरून प्रवेश करून 2 बॅकपॅकर्स, अमेरिकन नागरिक कोनी जो बोरोन्झिच, आणि त्याची प्रेयसी कॅनेडियन लॉरेंट कॅरीरे, यांची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
या घटनेनंतर एका वृत्तपत्राने त्याचे छायाचित्र प्रकाशित केल्यानंतर 1 सप्टेंबर 2003 रोजी तो नेपाळमधील एका कॅसिनोबाहेर दिसला. त्यानंतर त्याला लगेच अटक करून काठमांडू आणि भक्तपूर येथील जोडप्याची हत्या केल्याच्या आरोपावरून दोन स्वतंत्र खुनाचे गुन्हे दाखल केले. चार्ल्स शोभराज हा काठमांडूच्या मध्यवर्ती कारागृहात 21 वर्षांपसून तुरुंगवासात आहे. परदेशी नागरिकांच्या हत्येसाठी 20 वर्षे आणि बनावट पासपोर्ट वापरल्याबद्दल एक वर्ष आणि 2,000 रुपये दंड अशी शिक्षा झाली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









