कुख्यात गुन्हेगार जोडगोळी पोलिसांच्या जाळय़ात : शहर व उपनगरांतील अनेक चोरी प्रकरणांचा तपास शक्मय
प्रतिनिधी / बेळगाव
चोऱया, घरफोडय़ा करणाऱया कुख्यात गुन्हेगारी टोळीतील एक जोडगोळी बेळगाव पोलिसांच्या जाळय़ात अडकली आहे. त्यामुळे बेळगाव शहर व उपनगरांतील अनेक चोरी प्रकरणांचा तपास शक्मय होणार असून कुख्यात चोरटा प्रकाश पाटील दोन वर्षानंतर बेळगाव पोलिसांना सापडला आहे.
प्रकाश पाटील (वय 37, मूळचा रा. सरस्वतीनगर, शहापूर, सध्या रा. झरीवाडा, साखळी-गोवा), महेश केळगीनकोप्प (वय 37, रा. वैभववाडी, सिंधुदुर्ग) अशी या जोडगोळीची नावे आहेत. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी या जोडगोळीला अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
गुरुवारी सायंकाळी प्रकाश व महेश यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार प्रकाश हा चोरी, घरफोडय़ा प्रकरणातील आंतरराज्य गुन्हेगार आहे. महेश हा मूळचा खानापूरचा असल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. मात्र गुरुवारी सायंकाळी प्रकाश व महेश यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. दोन वर्षांनंतर प्रकाशला अटक झाली आहे. प्रकाश विनायक पाटील हा मूळचा बेळगावचा असला तरी सध्या गोव्यात त्याचे वास्तव्य आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ांत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गोव्याहून येऊन तो बेळगावात चोऱया करतो. यापूर्वीही बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता प्रकाश व त्याचा साथीदार कॅम्प पोलिसांच्या जाळय़ात अडकले आहेत.
कुख्यात जोडगोळी
- बेळगावसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ांत गुन्हे दाखल
- दोन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत