► वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये पाटणा पूर्व आणि ग्रामीण भागातील दोन बड्या गुन्हेगारांना रविवारी अटक करण्यात आली. यामध्ये जेथुली प्रकरणातील 50 हजारांचे बक्षीस असलेला रितेश कुमार उर्फ लप्पू राय याचा समावेश आहे. त्याच वेळी, पूर्व भागातील ‘टॉप 10’ गुन्हेगारांमध्ये समाविष्ट असलेला गौरीचक परिसरातील शैलेंद्र यादव उर्फ करू यालाही अटक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसात बिहार पोलिसांनी गुन्हेरानांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या अन्य एका कारवाईत मधुबनीतील खजौली येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 57 वर गस्त घालत असताना तीन कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. खजौलीचे डीएसपी मनोज राम यांनी यासंबंधीची माहिती दिली. काही गुन्हेगार गुह्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.









