८ गुन्ह्यांचा उलगडा, १४.९३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सोलापूर :
रात्री घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. चोरीस गेलेला सुमारे १४ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मंगेश उर्फ मनशा तरंगफुले काळे (वय ४२, रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे आहे. त्याच्यासोबत राम काळूराम भोसले व श्याम काळूराम भोसले (दोघेही रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर, जि. पुणे) या दोन साथीदार आरोपींचाही समावेश आहे.
या आरोपींवर मोहोळ, माळशिरस, अकलूज, कुर्डवाडी, टेंभुर्णी, पंढरपूर, सांगोला, परंडा, बारामती व इंदापूर पोलीस ठाण्यांत घरफोडी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
गृहफोड्यांच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी विशेष मोहिम हाती घेतली होती. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्यांच्या तपास पथकास मार्गदर्शन करून तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर आणि त्यांच्या पथकाने टेंभुर्णी येथे गस्त घालत असताना, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार भरले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, झोनमध्ये एक रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत आहे. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून अकलूज चौकात मंगेश काळे याला अटक केली. चौकशीत त्याने साथीदारांचेही नावे उघड केली.
पोलीसांनी आरोपींकडून सर्व मुद्देमाल जप्त केला असून गुन्ह्यांचा पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप
तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी स्वराज्य निंबाळकर, सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, शशिकांत कोळेकर, अश्विनी गोटे, पल्लवी इंगळे, दिपाली जाधव, अनवर अत्तार, यश देवकते, समर्थ गाजरे, योगेश जाधव, सुनंदा झळके, दिपाली थोरात आणि सायबर पोलिस ठाण्याचे व्यंकटेश मोरे.








