भागलपूर
बिहारच्या भागलपूरमध्ये अगुवानी-सुल्तानगंज पूल कोसळल्यानंतर बिहार सरकारने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रस्तेनिर्मिती विभागाचे अतिरिक्त सचिव प्रत्यय अमृत यांनी याप्रकरणी कार्यकारी इंजिनियरला निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बिहारमध्ये जो पूल कोसळला त्याचे भूमिपूजन 4 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले होते. 1717 कोटी रुपयांच्या खर्चातून तयार होणाऱ्या पूलाचा एक हिस्सा दोन वर्षांपूर्वीच कोसळला होता.









