कोल्हापूर,प्रतिनधी
शहराच्या हद्दिलगतच्या मोरेवाडी, पाचगाव, कळंबा या ग्रामपंचायतीकडील विनाप्रक्रिया 15 एलएलडी (दशलक्ष लिटर) सांडपाणी जयंती बंधारा येथे येत आहे. यामुळे मनपाची उपसा यंत्रणा कमी पडत असल्यामुळे जयंती नाला ओव्हरफल्लो होवून सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. ही बाब कॉमन मॅन संघटना, प्रजासत्ताक सेवा संस्थेने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या, अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.याची गंभिर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी या प्रकरणी कळंबा,मोरेवाडी,पाचगांव ग्रामपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावली.
महापालिका कार्यकक्षेमधील 76 दशलक्ष लिटर व 17 दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व उपसा केंद्र सुरू असताना जयंती बंधारा ओव्हरफ्लो होत आहे. यामुळे शहराच्या दक्षिण पश्चिम हद्दिवरून शहरात येणाऱ्या सर्व नाल्यांची मनपा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.यामध्ये मोरेवाडी आणि आर. के नगरमधून प्रत्येकी 1.5 दशलक्ष लिटर सांडपाणी शहराच्या हद्दीत येत आहे.तसेच पाचगावातून 8 तर कळंब्यातून 6 ते 8 दशलक्ष लिटर शहरात येत असलयाचे दिसून आले.यानंतर कॉमन मॅन संघटनेचे ऍड.बाबा इंदूलकर,प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा- World Heritage Week : कोल्हापूरचे प्रेरणास्थान लक्ष्मी विलास पॅलेस
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी 18 नोव्हेंबर रोजी जागेवर जावून पाहणी केल्यानंतर त्यांनाही लगतच्या तीनही गावातून शहरात सांडपाणी येत असल्याचे आढळून आले.यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जे.एस.साळुंखे यांनी बुधवारी पाचगांव,कळंबा,मोरेवाडी ग्रामपंचयातीला करणे दाखवा नोटीस बजावले.यामध्ये म्हटले आहे,यापूर्वी वारंवार सांगूनही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारलेला नाही.पाहणीमध्ये सांडपाणी शहराच्या हद्दीत जावून थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले आहे.यासंदर्भात 7 दिवसांत म्हणणे सादर करावे.
Previous Articleखाणींसह वाळू, चिरे व्यवसायही लवकरच मार्गी
Next Article निप्पाणीत बास्केटमध्ये आढळला नवजातशिशु









