किंमत 9,999 रुपये असणार
वृत्तसंस्था/ मुंबई
अनुभवी टेक ब्रँड नथिंगने भारतासह जागतिक बाजारपेठेत पारदर्शक डिझाइनसह नथिंग इयर 2 इयरबड्स नव्याने लाँच केले आहे. नव्याने दाखल झालेला नथिंगचा हा दुसरा इयरबड आहे, या अगोदर कंपनीने गेल्या वर्षी नथिंग इयर 1 लाँच केले होते. त्यावेळी a6 लाख युनिट्सची विक्री कंपनीने केली होती.
द नथिंग इयर (2) ड्यूअल पेअरिंग हे स्पष्ट आवाज तंत्रज्ञानासह येणार आहे. 40 डीबी आवाज कमी करणारे हे इयरबड्स आहेत असे कंपनीने म्हटले आहे.
कधी खरेदी करता येणार?
नथिंगने इयर 2 बडस् लाँच केले असून त्याची कंपनीने भारतीय बाजारात किंमत 9,999 रुपये इतकी ठेवली आहे. ते फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर 28 मार्चपासून दुपारी 12 नंतर उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.









