बाळासाहेब उबाळे,कोल्हापूर
कोल्हापूर-मुंबई मार्गावर सध्या स्टार एअरवेज कंपनीची विमानसेवा सुऊ आहे. स्टार एअरवेज बरोबर 26 मार्चपासून इंडिगो कंपनीची कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा खासदार धनंजय महाडिक यांनी जानेवारी महिन्यात केली होती.पण इंडिगोने विमानसेवा देण्यास असमर्थता दर्शवल्याने 26 मार्चचा उडाणाचा मुहूर्त हुकला. त्याऐवजी आता स्टार एअरवेजतर्फेच 5 एप्रिल पासून सेवा देण्यात येणार असून तीन ऐवजी चार दिवस उड्डाण होणार आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे.नाईट लँडिंगचे काम पूर्ण झाले असून रात्रीच्या वेळीही विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली आहेत. धावपट्टीचा विस्तार झाला आहे. तर नवीन टर्मिनल इमारतीचे काम सुरू आहे.ऑक्टोबर 2023 पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास नुकताच केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना व्यक्त केला आहे. विमानाच्या माध्यमातून कोल्हापूर शहराची हवाई कनेक्टीव्हीटी देशातील अन्य मोठ्या शहरांशी वाढवण्यासाठी या बाबी सकारात्मक आहेत.
सध्या कोल्हापुरातून तिरूपती,हैदराबाद,अहमदाबाद आणि मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू आहे.या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.कोल्हापूर-मुंबई मार्गावरील स्टार एअरवेजच्या विमानसेवेलाही प्रतिसाद आहे.पण सकाळच्या सत्रात हे विमान सुरू करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी 26 मार्चपासून कोल्हापूर-मुंबई मार्गावर इंडिगो कंपनीची विमानसेवा सुरू होईल,अशी घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. पण 26 मार्चला इंडिगोकडून विमानसेवा सुरू झाली नाही.इंडिगो कंपनीकडून सध्यातरी कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
दरम्यान,आता स्टार एअरवेजकडूनच या मार्गावर सेवा देण्यात येणार आहे.कोल्हापूर-मुंबई मार्गावर 5 एप्रिलपासून मंगळवार,बुधवार, गुरुवार आणि शनिवार असे चार दिवस उड्डाण होणार आहे. मुंबई विमानतळावरुन सकाळी साडेदहा वाजता विमानाचे उ•ाण होऊन ते कोल्हापुरात सकाळी 11.30 वाजता पोहोचणार आहे. तर कोल्हापूरमधून सकाळी 11.55 वाजता पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. मुंबईमध्ये हे विमान दुपारी 12.55 वाजता पोहोचणार आहे. 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे.
तांत्रिक कारणांमुळे इंडिगोची विमानसेवा नाही
26 मार्चपासून इंडिगो कंपनीची कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरु होणार होती. पण तांत्रिक अडचणीमुळे इंडिगोची विमानसेवा सुरु झाली नाही.
धनंजय महाडिक, खासदार
उडाण योजनेबाबत तक्रारी
केंद्र शासनाच्या उडाण योजनेत कोल्हापूर-मुंबई या मार्गाचा समावेश आहे. स्टार एअरवेजकडून या मार्गावर सेवा दिली जात आहे. पण उडाण योजनेतून तिकिट मिळत नसल्याच्या तक्रारी प्रवाशातून होत आहेत. याबाबत विमानतळ प्रशासनाकडूनही समाधानकारक माहिती मिळत नाही.
Previous Articleजिह्यात 19 हजार मतदारांची नावे वगळणार !
Next Article ‘रमजान’साठी आरोग्यदायी खजूराचे विविध प्रकार दाखल









