मडगाव सभेतील हिंदूविरोधी वक्तव्यांचा सुभाष वेलिंकरांकडून निषेध
पणजी : सत्ताधारी भाजपला विरोध, श्री राम मंदिराला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांना लोकसभेच्या निवडणुकीत पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आणि गोव्यातील जातीय सलोखा बळकट करण्याच्या नावाखाली, ‘गोंयकार एक पावल एकचाराचे’ या मंचावर मडगावच्या लोहिया मैदानावर झालेली सभा ही सर्वधर्मीय सलोख्यासाठी नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अन्य हिंदू संघटनांविऊद्ध विषारी गरळ ओकण्यासाठी घेण्यात आली होती हे जनतेसमोर प्रमाणित झाले आहे. या सभेतील सर्व हिंदूविरोधी वक्तव्यांचा तीव्र निषेध भारत माता की जय संघाचे संस्थापक, मार्गदर्शक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. मातृभाषा रक्षणाच्या व चर्चच्या इंग्रजी शाळांना अनुदान देण्याच्या प्रŽावर जरी असंख्य संघ कार्यकर्ते गोव्याच्या रा. स्व. संघाच्या यंत्रणेच्या बाहेर पडून ‘भारत माता की जय’ या संघटनेचे काम करीत असलो, तरी आम्ही संघ स्वयंसेवकत्व, संघाचे विचार व तत्वज्ञान सोडलेले नाही. जातीय सलोखा हिंदूंनीच बिघडवलेला आहे असा आरोप ऊठ सूठ हिंदू संघटनांवर करणाऱ्या ‘एक पावल एकचाराचा आम्ही निषेध करतो.
देशाचे संविधान स्वीकृत झाल्यानंतर काँग्रेस सरकारने त्यांच्या सत्ताकाळात हे संविधान किमान 92 वेळा तोडून-मरोडून त्यात त्यांना आवश्यक ते बदल केलेले आहेत. इंदिरा गांधींनी स्वत:ची खुर्ची टिकवण्यासाठी संपूर्ण देश तुऊंग बनवून लादलेल्या आणिबाणीतच, जवळजवळ सगळे विरोधक तुऊंगात असताना आणि संसदेत कसलीही चर्चा घडवून न आणता ‘धर्मनिरपेक्ष व समाजवादी’ हे शब्द घटनेत घुसडले होते हे एकचारवाले विसरले काय? काँग्रेसने सुप्रिम कोर्टात ‘रामायण’ हे सत्य नव्हे, थोतांड आहे असे प्रतिज्ञापत्र दिल्यानंतरही श्री राममंदिर अयोध्येत मूळ जागीच स्थापन करणारे सरकार जनसमर्थनामुळे अधिकारावर आलेच ना? धर्माच्या आधारावर, देश तोडून, मुसलमानांसाठी पाकिस्तान दिला. उरलेला, अजून शिल्लक राहिलेला भाग, त्याच निकषावर स्वभाविकपणे हिंदूराष्ट्र म्हणून घोषित व्हावा, अशी हिंदूंची भावना असली तर तो ‘देशद्रोह’ होतो, हे ठरवणारे तुम्ही हिंदूद्वेष्टे कोण? लोकभावना विजयी झाली आणि संविधानाद्वारे ‘हिंदूराष्ट्र’ ही घोषित झाले तरी लोकशाहीत ते कायदेशीर ठरणार नाही, असे तर एकचाराचे म्हणणे आहे.
फातोर्डा येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या केंद्र सरकारने बंदी घातलेल्या आतंकवादी जिहादी संघटनेची राजकीय शाखा एस.डी.पी.ओ. या पक्षाची स्थापना करायला जमलेल्या किमान अडिच हजारच्या मुस्लिम समाजाने दिलेल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा आणि भर मडगावमध्ये राममंदिर तोडून पुन्हा बाबरी उभारू या आशयाचे पोस्टर सर्वत्र लावले व खुद्द मडगावमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे दिलेले नारे एकचारवाल्यांना ऐकू आलेच नाहीत? पॉप्युलर फ्रंटच्या वर्चस्वखालील ऊमडामळ पंचायतीत चाललेली दादागिरी व धुमाकूळ जातीय सलोखा कसा बिघडवत आहेत हे माहीतच नाही?
भर गोवामुक्तीदिनी सुकूर मेंदीश हा पाद्री देशद्रोहाचे पोर्तुगीज-धार्जिणे भाषण देतो, राशोल सेमिनारीचा रेक्टर फादर व्हिक्टर फेर्राव, ‘पोर्तुगीज आले तेव्हा गोव्यात हिंदू नव्हतेच; पोर्तुगीजांनी पाडलेली मंदिरे हिंदूंची नव्हती, अन्य पंथियांची होती!‘ असा खोटा इतिहास प्रसृत करतो. गोव्याची जनता ज्यांना आराध्य दैवत मानते अशा छत्रपती शिवरायांचा अवमान, फादर बोल्मॅक्स हा पाद्री भर चर्चच्या आल्टारवर धार्मिक शेर्मांव देताना करतो. आणखीही घटना आहेत. या सगळ्या घटना ‘अराष्ट्रीय’ या सदरात येतात. त्यांची सरमिसळ जातीय सलोख्याशी मुद्दाम हेतूपुरस्सर का घातली जात आहे? सगळा हिंदू वा ख्रिस्ती वा मुस्लिम समाज त्याला जबाबदार नसतो. जातीय सलोखा त्यामुळे बिघडण्याचा प्रŽ येतोच कुठे? अराष्ट्रीय कृत्यांना, मग ती कोणत्याही धर्मियाकडून होवो, विरोध झालाच पाहिजे. त्यांवर प्रतिक्रिया येणारच. खरे म्हणजे सर्व धर्मियांनी या कृत्यांचा विरोध केलाच पाहिजे. ते करत नाहीत. परंतु, प्रतिक्रिया देणारेच जातीय सलोखा बिघडवतात असे एकचार म्हणणे आहे. हिंदू समाज टार्गेट करून त्याच्यावर असल्या राजकारण-प्रभावी मंचावर टाळ्या मिळवण्यासाठी, उठसूट शिंतोडे उडवणे बंद करा असा इशारा सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.








