आशिष चंचलानीने अभिनेत्री आणि मॉडेल एली अवरामला डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. आशिषने एलीसोबतचे छायाचित्र शेअर केले. याच्या पॅढप्शनदाखल आशिषने ‘फायनली’ अशी कॅप्शन दिली होती. यावर अभिनेता नील नितिन मुकेश आणि पुलकित सम्राटने त्याचे अभिनंदन केले होती. परंतु हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये नसल्याचे समोर आले.
आशिष हा अभिनेता आणि युट्युबर असून तो स्वत:चे फनी व्हिडिओ आणि पॅरोडीसाठी ओळखला जातो. आशिषचे युट्यूबवर मोठ्या संख्येत फॉलोअर्स आहेत. तर एली अवराम ही स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री आहे. भारतात एलीला बिग बॉस 7 मध्ये भाग घेतल्यावर ओळख मिळाली. ती मिकी व्हायरस, किस किस को प्यार करूं, नाम शबाना आणि गुडबाय यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.









