वृत्तसंस्था/ ऍडलेड
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या खुल्या ऍडलेड टेनिस स्पर्धेत झेकच्या 18 वर्षीय लिंडा नाकोव्हाने बेल्जिमच्या माजी टॉप सिडेड व्हिक्टोरिया अझारेंकाला पराभवाचा धक्का देत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत द्वितीय मानांकित साबालेन्काने शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले आहे.
शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नोस्कोव्हाने अझारेंकाचा 6-4, 6-7 (3-7), 7-6 (8-6) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत नोसकोव्हाने यापूर्वीच्या सामन्यात कॅसेटकीनाला पराभवाचा धक्का दिला होता. नोस्कोव्हाचा उपांत्य फेरीचा सामना द्वितीय मानांकित जेबॉरशी होणार आहे. जेबॉरने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मार्टा कोस्टय़ूकचा 7-6 (7-5), 7-5 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळवले. साबालेन्काने व्होंड्रोसोवावर 6-3, 7-5 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. तिचा पुढील फेरीतील सामना बेगुशी होणार आहे. बेगुने कुड्रेमेटोव्हावर 7-5, 6-4 अशी मात करून उपांत्य फेरी गाठली आहे.









