वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या मेक्सिकन खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेचा द्वितीय मानांकित कास्पर रुडने एकेरीत विजयी सलामी देताना अर्जंटिनाच्या अँड्रेओझीचा पराभव केला. पहिल्या फेरीतील सामन्यात रुडने अँड्रेओझीवर 6-4, 4-6, 7-6(7-2) अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. 2022 च्या टेनिस हंगामात कास्पर रुडने एटीपी टूरवरील तीन स्पर्धा जिंकल्या असून त्याने फ्रेंच आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. मेक्सिकन स्पर्धेत रुडने दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात डॅनियलने वुल्फचा 6-4, 6-4, चौथ्या मानांकित रुनेने शेल्टनचा 6-7(5-7), 6-4, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले









