वृत्तसंस्था / रियाद
येथे झालेल्या पहिल्याच ईस्पोर्ट्स विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद नॉर्वेचा ग्रॅन्डमास्टर मॅग्नस कार्लसनने पटकाविले. कार्लसनने या जेतेपदाबरोबरच 250, 000 डॉलर्सचे पहिले बक्षीस जिंकले.
या स्पर्धेतील अंतिम लढतीत कार्लसनने अलिरेझा फिरोजाचा पराभव केला. या स्पर्धेसाठी एकूण 1.5 दशलक्ष डॉलर्सची रक्कम आयोजकांनी ठेवली होती.









