बेकादेशीर चिरेखाणीप्रकरणी खाण खात्याचा दणका
पणजी : बेकायदेशीर चिरेखाणी प्रकरणी खाण खात्याने नार्वे कोमुनिदादला 40 लाख ऊपयांचा दंड ठोठावला असून तो 60 दिवसांत भरण्याचा आदेश दिला आहे. त्याशिवाय कोळंब खाणीवरुन खनिजमालाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या कोल्हापूरच्या कंपनीसही खात्यातर्फे 5 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच तो खनिजमाल मूळ ठिकाणी पुन्हा नेण्यास खात्याने कंपनीस बजावले आहे. बेकायदा चिरेखाणीची दखल घेऊन खाण खात्याने ही कडक कारवाई केली आहे. नार्वे कोमुनिदादच्या जागेत बेकायदा चिरेखाणी खुलेआम चालत होत्या. खाण खात्याने तपासणी कऊन अहवाल तयार केला. चिरेखाणींना नार्वे कोमुनिदादने आक्षेप घेतला नाही तसेच तक्रारही केली नाही. त्यामुळे कोमुनिदादचा त्या चिरेखाणींना पाठिंबा होता की काय? अशी शंका समोर आली होती. खात्याने याप्रकरणी चौकशी केली आणि 40 लाखाचा दंड ठोठावला आहे. ती रक्कम 60 दिवसात भरावी असे खात्याने स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे खाण खात्याने नार्वे कोमुनिदादला दंडाचा मोठा दणका दिला आहे. कोळंब खाणीवऊन बेकायदा खनिजमाल वाहतूक करणे संबंधित कंपनीस भोवले आहे. कोल्हापूर येथील मे. वेंकटेश्वर पॉवर प्रोजेक्ट कंपनीस खात्याने ऊ. 5 लाख दंड केला आहे. कंपनीने ई-लिलावातील 1410 टन खनिजमाल उचलून त्याची वाहतूक केली होती. ती खात्याने बेकायदेशीर ठरविली असून तो माल जेथून उचलला होता, तेथे परत नेण्यात यावा, असे बजावले आहे.









