जपानच्या सागरी हद्दीत कोसळले ः अमेरिका-दक्षिण कोरियाच्या सैन्याभ्यासाची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था/ प्योंगयांग
उत्तर कोरियाने पुन्हा एकदा पूर्व सागरमध्ये दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs डागली आहेत. जपान समुद्राच्या दिशेने ही क्षेपणास्त्रs डागण्यात आल्याची माहिती दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री ली-जोंग सुप यांनी दिली आहे. जपानने देखील याची पुष्टी दिली आहे. परंतु हे क्षेपणास्त्रs कोणते होते आणि किती अंतरापर्यंत ते पोहोचले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
क्षेपणास्त्राचे दुसरे परीक्षण अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याभ्यासाच्या दुसऱया दिवशी पार पडले आहे. 18 फेब्रुवारी रोजी उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र परीक्षण केले होते. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त सैन्याभ्यास सुरू केला होता.
23 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात वॉशिंग्टनमध्ये सैन्याभ्यास तसेच आपत्कालीन स्थितीतील रणनीतिवरून टेबलटॉप एक्सरसाइज पार पडणार आहे. यादरम्यान दोन्ही देशांमध्ये संभाव्य धोके पाहता अण्वस्त्रांचा वापर तसेच संकट व्यवस्थापनावरून चर्चा होणार आहे.
उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रांच्या वापराची धमकी देण्यात येत असल्याने दोन्ही देश गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यासह क्षेत्रात अमेरिकेची भागीदारी वाढविण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. तसेच मार्च महिन्यात दोन्ही देशांच सैन्य संयुक्त युद्धाभ्यासात देखील सामील होणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने उत्तर कोरियावर आण्विक आणि बॅलेस्टिक शस्त्रास्त्रांच्या परीक्षणावरून बंदी घातली आहे. बंदी असली तरीही उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले जात आहे. यापूवीं मागील वर्षीही क्षेपणास्त्र परीक्षण करण्यात आले होते. उत्तर कोरिया सातत्याने स्वतःच्या सैन्यशक्तीत भर घालू पाहत आहे. उत्तर कोरियाने चालू वर्षात आतापर्यंत 34 क्षेपणास्त्रs डागली आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यात उत्तर कोरियाकडून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र हे अधिक धोकादायक होते असे मानले जाते. या क्षेपणास्त्राने 6,248 किलोमीटर उंचीपर्यंत उड्डाण करत 1090 किलोमीटर अंतर कापले होते.









