वृत्तसंस्था/ गुवाहाटी
132 व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाने आपली विजयी सलामी दिली. या स्पर्धेतील येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नॉर्थ ईस्ट युनायटेडने शिलाँग लेजाँग संघाचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.
या सामन्यात नॉर्थ ईस्ट संघातील आसामचा फुटबॉलपटू पी. गोगोईने शानदार हॅटट्रीक नोंदविली. वरिष्ठ पातळीवरील स्पर्धेतील गोगाईची ही पहिली हॅटट्रीक आहे. ड गटातील या सामन्यात विजयी सलामीनंतर नॉर्थ ईस्ट युनायटेडने आघाडीचे स्थान मिळविले आहे.









