वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाँडेचेरी येथे 24 जुलैपासून सुरु होणाऱ्या 2023 च्या देवधर करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या उत्तर विभाग संघाचे नेतृत्त्व डावखुरा फलंदाज दिल्लीचा नितीश राणा याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी 15 जणांचा उत्तर विभाग संघ जाहिर करण्यात आला. या संघामध्ये अभिषेक शर्मा, प्रभसिमरनसिंग, हर्षित राणा यांचा समावेश आहे. 13 ते 23 जुलै दरम्यान लंकेत होणाऱ्या इमर्जिंग संघांच्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये अभिषेक शर्मा, प्रभसिमरनसिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.
उत्तर विभाग संघ : नितिश राणा (कर्णधार), अभिषेक शर्मा, प्रभसिमरनसिंग, रोहिला, खजूरिया, मनदीपसिंग, हिमांशु राणा, व्ही. शर्मा, निशांत सिंधू, ऋषी धवन, युद्धवीर सिंग, संदीप शर्मा, हर्षित राणा, वैभव अरोरा आणि मयांक मार्कंडे.









