जॅकलीन फर्नांडिसची घेतली जागा
भारतीय चित्रपटसृष्टीतील मार्शल आर्ट तज्ञ म्हणून ओळखला जाणारा विद्युत जामवाल लवकरच एका चित्रपटात दिसून येणार आहे. विद्युत सध्या ‘क्रॅक’ या चित्रपटावरून चर्चेत आहे. या चित्रपटात त्याची नायिका म्हणून जॅकलीन फर्नांडिस झळकणार होती. परंतु आता या चित्रपटात जॅकलीनच्या ऐवजी नव्या अभिनेत्रीची एंट्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात नोरा फतेही मुख्य भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वत:चे नृत्यकौशल्य आणि आयटम नंबर्ससाठी चर्चेत असणारी नोरा फतेही आता स्वत:चे अभिनयकौशल्य दाखवून देण्यास तयार आहे. हिंदी चित्रपट ‘रोर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी नोरा ‘क्रॅक’ चित्रपटात काम करणार आहे.
क्रॅक या चित्रपटात मुंबईच्या झोपडपट्टीपासून अंडरग्रांउड एक्सट्रीम स्पोर्ट्समध्ये नाव कमाविणाऱ्या व्यक्तीची कहाणी दर्शविली जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहे. आदित्यने यापूर्वी कमांडो 3 या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर क्रॅकमध्ये नोरा अन् विद्युत ही जोडी पहिल्यांदाच दिसून येणार आहे.
नोरा अन् जॅकलीन या दोघींचे नाव कथितपणे ठकसेन सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी जोडले गेले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये नोराने जॅकलीन विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
क्रॅक हा भारताचा पहिला एक्सट्रीम स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटात विद्युत अनेक स्पोर्ट्स बेस्ड अॅक्शन स्टंट्स करताना दिसून येणार आहे. तर नोरा लवकरच ‘मडगाव एक्स्प्रेस’, ‘100%’ आणि ‘मटका’ यासारख्या चित्रपटांमधून झळकणार आहे.









