बॉलीवूड सेन्सेशन नोरा फतेही ने नुकताच एक मिनी व्ह्लॉग इन्साग्रामवर शेअर केला. हा व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नोराने या व्ह्लॉग तिचा कोकण रेल्वेचा प्रवास शेअर केला आहे.
नोराच्या टीममधील अनुपचे लग्न रत्नागिरीला होते. या लग्नासाठी नोराने पहिल्यांदाच रेल्वेचा प्रवास केला. ती कोकण रेल्वेतून रत्नागिरीला गेली होती. या लग्नातील मराठमोळी हळद तिने खूप एन्जॉय केली.
नोरा ने अनुप हा तिचा टीम मेंबर असूनही तिला भावासारखा आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो तिच्यासोबत काम करत आहे. त्याच्या लग्नात नोरा आपला मराठमोळा अंदाज दाखवला. तिने या प्रवासात कोणी ओळखू नये म्हणून स्वतःला पूर्णपणे कव्हर करून हा व्ह्लॉग शूट केला.









