वरुण तेजसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार
अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. नोरा प्रामुख्याने नृत्यासाठी ओळखली जाते. सत्यमेव जयते या चित्रपटातील स्वत:च्या दिलबर गाण्यामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. नोरा आता लवकरच दाक्षिणात्य स्टार वरुण तेजसोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.

करुणा कुमार यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या चित्रपटात नोरा काम करत आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ठरलेले नसल्याने याला ‘वीटी14’ म्हटले जात आहे. नोरा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. अभिनयासोबत नोराचा यात एक स्पेशल डान्स नंबर देखील असणार आहे.
वरुण तेज व्हीटी14 सोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसून येणार आहे. वरुण तेजचा हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन प्रवीण सत्तारू यांनी केले आहे. नोरा ही मूळची विदेशी असून मॉडेल, नृत्यांगना अन् गायिका म्हणूनही तिने काम केले आहे. हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळी चित्रपटांमध्ये तिने यापूर्वी काम केले आहे. ‘रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ या चित्रपटाद्वारे तिने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.









