Nora Fatehi Ed Summons : मनी लॉंड्रिंग केस प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची ईडी कार्यालयात चौकशी झाली. या चौकशीत तिला
२०२२ मध्ये चेन्नई येथे झालेल्या कार्यक्रमा संदर्भात माहिती विचारण्यात आली. यामध्ये तिला सुकेश चंद्रशेखरने बीएमडब्लू कार देण्याची आॅफर दिल्याची माहिती नोराने दिली आहे. सोबतच सुकेशसोबतच्या फोनवरील चॅटच्या स्क्रीनशॉटची प्रतही एजन्सींना सादर केली.
सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सारा अली खान आणि जान्हवी कपूर सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या, काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या. दरम्यान जॅकलीन त्याच्या बरीच जवळ आली. त्यामुळे या प्रकरणार तीची कसून चौकशी होत आहे.
जॅकलीनला ईडीने नुकतेच म्हणजे 14 सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. बुधवारी जॅकलीनची तब्बल आठ तास चौकशी झाली. यावेळी तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. जॅकलीन नंतर आता नोराची चौकशी झाली.
नोराने पोलिसांना या गोष्टी सांगितल्या होत्या
चेन्नई येथील हा कार्यक्रम एलएस कॉर्पोरेशन आणि नेल आर्टिस्ट्री (लेना मारिया) यांनी आयोजित केला होता. डिसेंबर 2020 मध्ये चेन्नईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये याचे नियोजन केले होते. चौकशीदरम्यान नोराने अधिकाऱ्यांना सांगितले होते, ‘हा कार्यक्रम चांगला होता. लीना मला भेटली होती आणि तिने मला एक गुच्ची बॅग आणि एक आयफोन दिला. ती म्हणाली होती की, माझा नवरा तुझा मोठा चाहता आहे, पण आता भेटू शकत नाही. पण तू त्याच्याशी फोनवर बोल. त्याने स्पीकरला कॉल लावला. त्याने (शेखर) माझे आभार मानले आणि ते दोघेही माझे मोठे चाहते असल्याचे सांगितले. त्यानंतर लीनाने प्रेमापोटी एक बीएमडब्ल्यू कार भेट देणार असल्याचे सांगितले.
यानंतर शेखर नावाच्या व्यक्तीने मला +1 (305)504- मोबाईल नंबरवरून कॉल केला. अधिक माहितीसाठी मी माझ्या चुलत बहिणीचा नवरा बॉबीचा नंबर त्यांना दिला होता. शेखरने माझ्याकडून तो नंबर घेतला होता. नोराने असेही सांगितले की तिने बॉबीला शेखरला सांगण्यास सांगितले होते की नोराला बीएमडब्ल्यू कारची गरज नाही, कारण तिच्याकडे आधीपासूनच बीएमडब्ल्यू कार आहे. त्यानंतर ती कार बाॅबीच्या नावे केल्याची माहिती समोर आली आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









