सूरत :
गुजरातच्या सूरत शहरात एका शिक्षकाला विद्यालय परसिरात गेट टूगेदर आयोजित करणे महागात पडले आहे. शहर प्राथमिक शिक्षण समितीने या शिक्षकाला निलंबित केले आहे. शाळा परिसरात मांसाहारी भोजन वाढण्याचा आरोप या शिक्षकावर आहे. शाळेचे प्रभारी शिक्षक प्रभाकर यांच्या विरोधात याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या शाळेत माजी विद्यार्थ्यांसाठी एक गेट-टूगेदर आयोजित करण्यात आले होते, यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी मांसाहाराची व्यवस्था करण्यात आली होती.









