सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर 23 फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत ब्राझील दौऱ्यावर गेले होते. ब्राझील दौऱ्यावरून ते भारतात पोहोचल्यानंतर त्यांनी सध्या अर्थसंकल्पी अधिवेशनात सहभाग दर्शवला होता. आज शनिवारी ते सावंतवाडी मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी ब्राझील अभ्यास दौऱ्याची माहिती दिली. लवकरच ब्राझीलची टीम महाराष्ट्रात येणार आहे. ब्राझीलशी नॉन डिस्क्लोजर करार करण्यात आला असून कोकणातील काजू बोंडूवर प्रक्रिया करणारे सिरप उद्योग आणता येतो का या दृष्टीने अभ्यास केला जाणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.









