सीडीएस अनिल चौहान यांचे महत्त्वाचे प्रतिपादन : आमने-सामने संघर्ष होण्याची शक्यता कमी
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भविष्यात नॉन कॉन्टॅक्ट वॉरच प्रामुख्याने होतील, आता येणाऱ्या काळात सैन्य आमनेसामने नसतील आणि युद्धही अशाच स्वरुपात होईल. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने आकाश क्षेपणास्त्र यंत्रणासारख्या पारंपरिक शस्त्रास्त्रांद्वारे स्वत:चा बचाव केला. याचबरोबर विदेशी आणि स्वदेशी रडारचीही मदत घेण्यात आली. भविष्याचे युद्ध जटिल असणार आहे. याच्या अंतर्गत जल, थल आणि आाकशात संघर्ष होईल, याचबरोबर रणनीति, हायब्रिड वॉरफेयर, प्रोपेगेंडा यासारख्या गोष्टही याचा हिस्सा असतील असे उद्गार भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी काढले आहेत.
मॉडर्न वॉरफेयर आम्हाला समजून घ्यावे लागणार आहे. नेटवर्क सेंट्रिक वॉरफेयरविषयी देखील आम्हाला चर्चा करावी लागेल. सायबर वॉरफेयरची भूमिका सध्या मर्यादित आहे, ऑपरेशन सिंदूरदरम्यान सायबर हल्ल्यांचा प्रयत्न झाला, परंतु मोठ्या प्रमाणावर याचा प्रभाव पडला नाही. याचबरोबर आमचे वायुदल आणि त्याचे तंत्रज्ञान इतके मजबूत होते की आमच्यावर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचा कुठलाच प्रभाव पडला नाही असे सीडीएस चौहान यांनी म्हटले आहे.
काय आहे नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेयर
नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेयर एक आधुनिक युद्धाची रणनीति असून यात शत्रूसोबत प्रत्यक्ष शारीरिक संपर्कात न येता त्याला नुकसान पोहोचविले जाते किंवा युद्ध लढले जाते. यात पारंपरिक युद्धाऐवजी (आमने-सामनेचा संघर्ष) आधुनिक तंत्रज्ञान, सायबर सामग्री आणि दूरवरून संचालित शस्त्रास्त्रांचा वापर होतो.
नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेयरची वैशिष्ट्यो..
प्रत्यक्ष संघर्ष होत नाही : सैनिक आमने-सामने लढत नाहीत.
तांत्रिक साधनांचा वापर : ड्रोन, क्षेपणास्त्रs, सायबर हल्ल्यांचा समावेश
सायकोलॉजिकल वॉरफेर : अफवा, खोट्या बातम्या फैलावून मानसिक दबाव
इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर : रडार, जीपीएस किंवा अन्य सिग्नल्सना बाधित करणे
अशाप्रकारच्या युद्धाचे लाभ
-स्वत:च्या सैनिकांचा जीव जोखिमीत न टाकता शत्रूला नुकसान पोहोचविणे
-युद्धाला अधिक अचूक अन् लक्ष्यित करणे
यातील काही आव्हाने
-नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित होतात.
-कधीकधी सामान्य नागरिकांवरही प्रभाव पडू शकतो (सायबर हल्ल्यामुळे वीजपुरवठा ठप्प होणे)









