मुंबई :
नोकीया कंपनीने सी 12 व सी 12 प्रो या फोन्सना अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केले होते. पाठोपाठ आता नोकीयाने सी 12 प्लस हा नवा फोनही सादर केला आहे. सदरच्या फोन कंपनीने ग्राहकांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध केला आहे. 6.3 इंचाचा डिस्प्ले या फोनला असणार असून 4 हजार एमएएचची बॅटरी यात असेल. 32 जीबी इंटर्नल स्टोरेजची सोय यात असणार असून बाजारात विक्रीकरीता मात्र अद्याप उपलब्ध केला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. या फोनची किमत 6 हजार 599 आणि 6 हजार 999 ऊपये इतकी माफक असणार आहे.









