माया आणि लीआ टाटा यांचा संचालक मंडळात समावेश : राजीनामा दिलेल्या विश्वस्तांमध्ये पसरली नाराजी
वृत्तसंस्था/मुंबई
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या मुली माया आणि लीआ टाटा यांचा सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे. एका अहवालामधून या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे. हा ट्रस्ट ग्रुप टाटा सन्स या होल्डिंग कंपनीच्या दोन प्रमुख भागधारकांपैकी एक आहे. या दोन्ही बहिणी नवीन नियुक्त्यांसाठी राजीनामा देणाऱ्या अर्नाझ कोतवाल आणि फ्रेडी तलाटी यांची जागा घेणार आहेत. यासह, नोएल टाटांची मुले आता लहान आकाराच्या टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळात सामील झाली आहेत. तथापि, त्यांना अद्याप सर रतन टाटा ट्रस्ट अँड अलाइड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट अँड अलाइड ट्रस्ट या दोन प्रमुख ट्रस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.
या संपूर्ण घटनेवर मात्र निवृत्त विश्वस्त अर्नाझ कोतवाल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या मंडळातील हा बदल वादात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवृत्त विश्वस्त अर्नाझ कोतवाल यांनी त्यांच्या सहकारी विश्वस्तांना लिहिलेल्या पत्रात या प्रक्रियेवर असमाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नवीन विश्वस्त आणण्यासाठी त्यांना ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास सांगितले गेले ते योग्य नव्हते. दुबईमध्ये राहणारे आणि व्हीएफएस ग्लोबलमध्ये काम करणारे कोतवाल यांनी लिहिले आहे की, मला वाईट वाटते की तुमच्यापैकी कोणीही या विषयावर बोलण्यासाठी माझ्याशी थेट संपर्क साधला नाही. माया टाटा न्यू अॅपचे व्यवस्थापन करणाऱ्या टीमचा भाग आहेत. माया टाटा यांनी टाटा कॅपिटलमधून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, सध्या त्या टाटा डिजिटल अंतर्गत टाटा न्यू अॅपचे व्यवस्थापन करणाऱ्या टीमचा भाग आहेत. लीआ टाटा इंडियन हॉटेल्समध्ये उपाध्यक्ष आहेत आणि आयई बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
नोएल टाटा ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष
रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना ‘टाटा ट्रस्ट’चे नवे अध्यक्ष बनवण्यात आले. ते यापूर्वी दोन कौटुंबिक ट्रस्टचे विश्वस्त होते. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. 9 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल एकमेव दावेदार होते. त्यांचा भाऊ जिमी यांचे नावही चर्चेत असले तरी ते त्याआधीच निवृत्त झाले. मुंबईतील ट्रस्ट बैठकीत नोएलच्या नावावर एकमत झाले. टाटा ट्रस्टने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘त्यांची नियुक्ती तात्काळ लागू केली जाईल.’ टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झाल्यानंतर नोएल टाटा म्हणाले, रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यास मी उत्सुक आहे. नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी नोएल आहे. नोएल नवल हे टाटांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. रतन टाटा आणि जिमी टाटा हे नवल आणि त्यांची पहिली पत्नी सुनी यांची मुले आहेत.









