वार्षिक सर्वसाधारण बैठकीत निर्णय
वृत्तसंस्था/मुंबई
टाटा समूहाची कंपनी ‘टाटा सन्स’ने 14 ऑगस्ट रोजी झालेल्या 107 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) नोएल टाटा यांची संचालक मंडळात नियुक्ती केली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा सन्सची ही पहिलीच सर्वसाधारण सभा होती. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. आता ते अधिकृतपणे टाटा सन्सच्या मंडळात सामील झाले आहेत. नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टने नियुक्ती केली आहे. मुंबईतील ट्रस्टच्या बैठकीत नोएल यांच्या नावावर एकमत झाले. नोएल हे रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत. 9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल हे वारसदार म्हणून एकमेव दावेदार होते. त्यांचे भाऊ जिमी यांचे नाव देखील चर्चेत होते, परंतु ते आधीच निवृत्त झाले होते.









