Nobel Peace Prize 2022 : यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) आणि रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला आहे. जगभरातील सर्वात मानाचा आणि बहुप्रतिक्षित असा पुरस्कार आहे.गेल्या वर्षी रशियाचे दिमित्री मुराटोव्ह आणि फिलीपिन्सच्या मारिया रेसा या पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार मिळाला होता.
कोणाला दिला जातो नोबेल पुरस्कार
कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. तसेच देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसंच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात अशा व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो.
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता. त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा. अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात. पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









