मोंगी जी बावेंडी, लुईस ई ब्रूस, अलेक्सी आय यांचा गौरव
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
2023 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार बुधवार, 4 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. मोंगी जी बावेंडी, लुईस ई ब्रूस आणि अलेक्सी आय यांना क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. रॉयल स्वीडिश अॅपॅडमी ऑफ सायन्सेसने बुधवारी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.
यावषी आतापर्यंत तीन श्रेणींमध्ये नोबेल पारितोषिके जाहीर करण्यात आले आहेत. फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रासाठी पॅटालिन पॅरिको आणि ड्य्रू वेसमन यांना सोमवारी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी पियरे ऑगस्टिनी, फेरेंक क्रॉस आणि अॅन ल्युलियर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता रसायनशास्त्र क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे.









