मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी आज मुंबईत (Mumbai) उद्योगपतींना भयमुक्त आणि भू-माफियांपासून मुक्त कायदा आणि सुव्यवस्थेचे आश्वासन दिले आणि 2017 पासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत असल्याचे सांगितले. तसेच उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) गुंतवणुक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत.10-12 फेब्रुवारी दरम्यान लखनौ येथे यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर समिट 2023 ला (UP Global Investor Summit 2023) प्रोत्साहन देण्यासाठी 8 शहरामधील व्यावसाईकांच्या भटीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आजच्य़ा दिवशी त्यांनी मुंबईतील व्यापारी आणि उद्योगपतींची भेट घेउन उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “2017 पुर्वी उत्तर प्रदेशात दरवेळी दंगली होत होत्या. पण आता परिस्थिती बदललेली आहे. 2017 नंतर उत्तर प्रदेशात कोणतीही दंगल झाली नाही. त्यामुळे कायदा व्यवस्था सुरळीत असून गुंतवणुकीसाठी योग्य आहे.”
पुढे बोलताना यूपीचे मुख्यमंत्री म्हणाले की, आज “कोणताही गुंड उत्तर प्रदेशमध्ये व्यापारी किंवा कंत्राटदाराकडून हप्ता वसूल करत नाही किंवा त्यांना त्रास देऊ शकत नाही. आम्ही भूमाफियाविरोधी टास्क फोर्स तयार करून त्यांच्याकडून 64,000 हेक्टर जमीन सोडवली आहे.” असे ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









