चिपळूण :
येथील मध्यवर्ती बसस्थानकाची जुनी इमारत तोडून नवीन ‘हायटेक’ बसस्थानक बांधण्यात येत आहे. यामुळे जीर्ण इमारत तोडतेवेळी जमा झालेले मोठ्या प्रमाणातील भंगार आगाराच्या आवारात ठेवण्यात आले आहे. मात्र सहा वर्षे उलटूनही याची निविदा प्रक्रिया न झाल्याने भंगाराचा प्रश्न अद्याप दुर्लक्षित राहिला आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेल्या या भंगाराची विक्री झाल्यास यातूनच एस. टी. महामंडळाच्या तिजोरीत भर पडणार आहे.
जीर्ण असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जगी नव्याने सोयी-सुविधांयुक्त बसस्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. बसस्थानकाची इमारात तोडतेवेळी त्यात लोखंडी छप्परासह पिलर व इतर अनेक लोखंडी भंगार जमा करण्यात आले होते. भारी वजनाचे असलेले हे भंगार जेसीबीच्या सहाय्याने उचलून आगाराचा मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते.
सद्यस्थितीत नव्या हायटेक बसस्थानक इमारतीचा पाया पूर्णत्वास गेला असून पिलरसह पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे कामही पूर्ण झाले आहे. त्यासाठी जवळपास सहा वर्षांचा कालवधी लागला आहे. असे असताना इतकी वर्षे होऊनही जुन्या इमारतीचे भंगार आहे त्याच ठिकाणी असून कित्येक वर्षात निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. यामुळेच हा भंगार प्रश्न आजपर्यंत दुर्लक्षित राहिला आहे.
- स्थानिक पातळीवर निविदा प्रक्रिया राबवणे सोयीस्कर
हे भंगार स्थानिक आगार प्रशासनाने विभागास्तरावर जमा केल्यानंतर त्याची एकत्रितरित्या निवादा प्रकिया राबवून खरेदी केली जाते. त्यासाठी स्थानिक आगार प्रशासनाने हे भंगार रत्नागिरी जमा करणे अपेक्षित असल्याचे अजब उत्तर आगार प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र मोठ्या प्रमाणात असलेले भंगार रत्नागिरी येथे ने-आण करण्यासाठी वाहतुकीचा खर्च अधिक येईल. त्या ऐवजी आहे त्या ठिकाणी या भंगाराची निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. या भंगाराची विक्री झाल्यास यातूनच एस.टी. महामंडळाच्या तिजोरीत भर पडणार आहे.
दुर्लक्ष…
जुनी बसस्थानक इमारत तोडीतील भंगार
प्रशासकीय पातळीवरील उदासिनता कारणीभूत








