महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : तारिहाळमध्ये रामलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन
बेळगाव : गावांच्या विकासासंदर्भात आपण केव्हाही राजकारण केले नाही. मत दिलेले असोत किंवा नसोत सर्वजण आपलेच असल्याची भावना ठेवली असल्याचे प्रतिपादन महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. तारिहाळ (ता. बेळगाव) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रामलिंगेश्वर मंदिराचे उद्घाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या बेलत होत्या. देवाच्या नावाने केव्हाही राजकारण केले नाही. विकासकामाचा ध्यास घेणारे, जनसेवा करणारे आपण आहोत. रामलिंग मंदिराचा विकास घडवून आणण्याचे आश्वासन तारिहाळ ग्रामस्थांना वर्षापूर्वी दिले होते. मंदिरासाठी 1 कोटींचे अनुदान मिळवून दिले आहे. मतदारसंघातील जनतेच्या पाठिंब्यामुळेच आपण मंत्रीपदावर पोहोचलो. देवावर आपला विश्वास आहे. देव आणि मतदारसंघातील जनतेच्या कृपेमुळेच आपण मोठ्या अपघातातून बचावलो. मतदारसंघात आणखी मंदिरे बांधण्याचा संकल्प केला आहे. आपण आमदार झाल्यानंतर मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणण्यावर अधिक भर दिला असल्याचे त्या म्हणाल्या.
होन्नीहाळ येथे विठ्ठल-बीरदेव मंदिराचे उद्घाटन
शुक्रवारी होन्नीहाळ येथे विठ्ठल-बीरदेव मंदिराचे उद्घाटन मंत्री हेब्बाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी लक्ष्मीताई फाऊन्डेशनतर्फे महाप्रसादाचे वितरण झाले. बडाल अंकलगी येथे 2 कोटी ऊपये खर्चातून लक्ष्मी मंदिर व तुरमुरी येथे ज्योतिर्लिंग मंदिराचे उद्घाटन केल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. बडेकोळ्ळमठाचे सद्गुऊ शिवयोगी नागेंद्र महास्वामी, नागय्या पुजार, प्रमोद जाधव, यल्लाप्पा खनगांवकर, स्पप्निल जाधव, सिद्दण्णा खनगांवकर, देमस्थान समिती सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.









