वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आमच्या समस्या सोडविल्याशिवाय आम्ही आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणार नाही, अशी घोषणा साक्षी मलिक या कुस्तीपटूने केली आहे. आम्ही आमच्या मागण्या केंद्रीय क्रीडामंत्र्यांसमोर ठेवल्या आहेत. त्यांची पूर्तता कशा प्रकारे होते याकडे आमचे लक्ष आहे. त्यानंतरच आम्ही कुस्तीच्या स्पर्धांकडे लक्ष देणार आहोत, अशी स्पष्टोक्ती अन्य कुस्तीपटूंनीही केली आहे.
याच महिन्यात आशियायी खेळांचे चाचणी सामने सुरु होणार आहेत. त्यात या कुस्तीपटूंनी भाग घेतला नाही, तर त्यांचा सराव योग्य प्रकारे होणार नाही. तसेच त्यांना पुढचे टप्पे गाठण्यात अडचणी येऊ शकतात, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. आम्ही सध्या अत्यंत कठीण मानसिक अवस्थेतून जात आहोत. आमच्या व्यथा आम्हालाच माहीत आहेत., असे कुस्तीपटूंनी स्पष्ट केले. चीनच्या हँगझोऊ येथे आशियायी क्रीडा स्पर्धा 23 ऑक्टोबर 2023 ते 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणार आहेत. त्याच्या दोन महिने आधीच हा वाद संपणे आवश्यक आहे.









