नवी दिल्ली : ज्या मुस्लिमाला आपल्या मनातले बोलायचे आहे त्याच्यावर बंदी घातली जाते असे ट्वीट करून भारतातील निवडणूकीमध्ये ज्या प्रकारे स्वैराचार चालला आहे, त्यावरून लोकशाहीची वाटचाल ही फॅसिजमकडे चालली आहे. असे मत AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले.
खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आपली भूमिका पीएफआयच्या बाजूने नाही हे स्पष्ट केले. तरीही त्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर घातलेल्या पाच वर्षांच्या बंदीचा निषेध केला. यूएपीए कायद्याला असलेल्या विरोधावरून ते म्हणाले की “या प्रकारची कठोर बंदी धोकादायक आहे. कारण बंधने त्या मुस्लिमावर घातली जातात ज्यांना काहीतरी बोलायचे आहे.” पुढे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “ज्या प्रकारे भारतातील निवडणुकीमध्ये स्वैराचार वाढत आहे त्यावरून लोकशआहीची वाटचाल ही फॅसिझमच्या दिशेने जात आहे, तसेच आता प्रत्येक मुस्लिम तरुणाला देशातील काळा कायदा ठरलेल्या UAPA अंतर्गत अटक केली जाईल” असे त्यांनी ट्विट केले.
पुढे ट्वीट करताना “मुस्लिमांनी निर्दोष मुक्त होण्यापुर्वी आपली अनेक वर्षे, अनेक दशके तुरुंगात घालवली आहेत. मी UAPA ला विरोध केला आहे आणि UAPA अंतर्गत होणाऱ्या सर्व कृतींना नेहमीच विरोध करीन. हा कायदा स्वातंत्र्याच्या तत्त्वाचे उल्लंघन करते. जो संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे” ओवेसी यांनी म्हटले आहे.
Previous Articleपुणे सहाय्यक पोलीस आयुक्तांवर गुन्हा नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश
Next Article Kolhapur : इन्स्पायर अवॉर्डमध्ये कोल्हापुरची बाजी









