केंद्र सरकारचे प्रतिपादन ः दिवसभरात 173 नवे कोरोना रुग्ण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चीनमध्ये कोरोना महामारीचे संकट तीव्र झाल्याने भारतात खबरदारी घेतली जात आहे. देशात सध्या दुसरा बुस्टर डोस देण्याची गरज नसल्याचे सरकारने प्रतिपादन केले आहे. सर्व नागरिकांना पहिला बुस्टर डोस दिला जात नाही तोवर सरकार यासंबंधी कुठलाच निर्णय घेणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. देशात सध्या कोरोनाचे 1,698 रुग्ण आहेत. मागील 24 तासांमध्ये दशात 173 नवे रुग्ण सापडले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांनी कोरोना महामारी रोखण्यासाठीच्या उपाययोजना अन् तयारींचा आढावा घेतला आहे. राज्यांनी स्वतःच्या स्तरावर खबरदारीदाखल अनेक पावले उचलली आहेत.









