कोल्हापूर / दीपक जाधव :
जिल्ह्यासाठी 100 खाटांच्या महिला आणि 100 खाटांच्या समान्य जिल्हा रुग्णालयाला सार्वजनिक आरोग्य विभागाने दहा वर्षांपुर्वी मान्यता दिली. हॉस्पिटलला म्ंाजुरी मिळून दहा वर्षांहुन अधिक काळ लोटला तरी अजूनही या दोन्ही हॉस्पिटल्सच्या जागेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
या दोन रुग्णालयासाठी शहरात मध्यवर्ती ठिकाणी जागा मिळत नसल्याने मंजुरी मिळूनही या रुग्णालयांची उभारणी होऊ शकलेली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले प्रकाश आबीटकर हे आज सार्वजनिक आरोग्य विभागाचेही मंत्री आहेत. परिणामी या हॉस्पिटल्ससाठी जागा मिळणार का, हा प्रश्न आहे.
जिह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी असणारा थोरला दवाखाना म्हणजे छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालय अर्थात सीपीआर हॉस्पिटल गेल्या 24 वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे 2000 पासून चल अचल साधनसामुग्रीसह हस्तांतरीत करण्यात आले. तेव्हापासुन कोल्हापूर शहरामधील जिल्हा रुग्णालयाचे अस्तित्व संपल्यात जमा आहे, ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 10 वर्षांपुर्वी शासनाच्या बृहत आराखड्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी शंभर खाटांचे जिल्हा रूग्णालय आणि शंभर खाटांचे महिला रुग्णालय मंजूर केले आहे. पण शहरामध्ये किमान महिला रुग्णालयासाठी जागा मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे.
2011 च्या जनगणनेनुसार कोल्हापूरची लोकसंख्या 38,76,001 इतकी होती. त्यात पुरुष 19,80,658 तर महिलांची 18,95,343 इतकी संख्या आहे. या लोकसंख्येत आजपर्यंत साधारण 43,85000 वाढ धरली तर या इतक्या लोकसंख्येमागे सद्यस्थितीत एकही जिल्हा रुग्णालय नाही, ही बाब लक्षात घेऊन शासनाने 2013-14 मध्ये 100 खाटाचे जिल्हा रुग्णालयासह 100 खाटांच्या महिला रुग्णालयास मंजुरी दिली आहे.
या रुग्णालयास अवश्यक असणारी प्रत्येकी दोन एकर जागा कोल्हापूर शहरामध्ये मिळत नाही. महिलाच्या निरोगी आरोग्यावर तासन्तास भाषण ठोकणारी नेतेमंडळी या महिला रुग्णालयाबरोबर जिल्हा रुग्णालयाला जागा देण्यासाठी लक्ष देतील का? सुदैवाने कोल्हापूर पालकमंत्री हेच राज्याचे आरोग्यमंत्री असताना सुध्दा केवळ आणी केवळ जागे अभावी जिह्यातील महीला व जिल्हारुग्णालय उभे राहु शकत नाही हे दुर्दैव आहे.
- ‘बफर झोन’ मुळे बैठक लांबली…
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी 25 डिसेबर 2024 ला सेवा रूग्णालयाला अचानक भेट दिली होती.यावेळीस त्यानी रूग्णालया समोरील मोकळ्या जागेची पहाणी केली.त्यावेळेस त्यानी या रूग्णालयासाठी या जागेचा विचार करता येतो का असे सागीतले होते. मात्र ती जागा पालीकेच्या कचरा प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये येत असल्याचे बोले जात आहे.पण यावर पालीकेच्या अधिकाऱ्या बरोबर बैठक घेण्याचे आरोग्य विभागाने निश्चित केले होते.मात्र आरोग्यंमत्र्याना वेळ मिळत नसल्याने बैठक होत नसल्याची चर्चा आहे.
- शासकीय इमारतीसाठी बफर झोन नाही
लाईन बाजार येथील सेवा रूग्णालय परिसरातील काही जागा बफर झोनमध्ये आहे. पण शासकीय नियमानुसार शासकीय इमारतीसाठी बफर झोन लागू होऊ शकत नाही. कारण बफर झोनच्या जागेचा नियम रहिवास क्षेत्रासाठी लागू आहे. पण तो शासकीय इमारतींसाठी नाही. येथे जर ही हॉस्पिटल्स झाली तर सर्वसामान्यांची आरोग्याच्यादृष्टीने अधिक चांगली सोय होणार आहे.
– बुरहान नायकवडी नागरीक, लाईन बझार, कसबा बावडा
- दोन ठिकाणी जागा पाहिली आहे…
जिल्हा महिला रूग्णालयासाठी कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी जागा पाहिली आहे. यातील 1 जागा शेंडा पार्कमध्ये आहे तर दुसरी जागा कसबा बावडा लाईक बाजार येथील सेवा रूग्णालयाच्या परिसरात आहे. या दोनपैकी एक जागा अंतीम करून वरिष्ठ कार्यालयाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्यात येणार आहे.
– डॉ. दिलीप माने, आरोग्य उपसंचालक कोल्हापूर








