सुदीप ताम्हणकर यांचे आवाहन : टॅक्सी स्टॅण्ड लवकरच होणार अधिसूचित
पेडणे : मोपा विमानतळावर आता पेडणेतील टॅक्सी बांधवांना टॅक्सी स्टॅण्ड हा हक्काचा मोपा विमानतळावर स्टॅन्ड अधिसूचित होणार आहे. तो अधिसूचित झाल्यानंतर पेडण्यातील अनेक टॅक्सी बांधवांचा प्रश्न सुटणार आहे. मात्र पेडण्यातील काही संघटना नको तो अपप्रचार करून यात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी अशी दुफळी माजू नये. प्रथम सरकारकडून टॅन्सी स्टॅन्डला मान्यता घ्यावी, असे आवाहन टॅक्सी असोसिएशनचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी केले आहे. पेडणे येथे बुधवारी टॅक्सी बांधवांसमावेत आयोजित पत्रकार परिषद घेण्यात आली. वाहतूक कायदा नियमानुसार पेडणे तालुक्यासाठी हा टॅक्सी स्टँड मिळणार आहे त्यासाठी टॅक्सी बांधवांनी वाहतूक खात्याकडे पीसीपीओ फॉर्म भरावा आणि तो भरल्यानंतर त्यांना प्राधान्य क्रमाने त्या ठिकाणी व्यवसाय करायला संधी मिळणार आहे. विघ्नसंतोषी लोकांनी टॅक्सी बांधवांची दिशाभूल करून मध्ये आठकाठी आणू आणू नये असे आवाहनही सुदीप ताम्हणकर यांनी केले. लवकरच टॅक्सी स्टॅन्डला मान्यता मिळणार आहे, त्यासाठी सरकार आणि मुख्यमंत्र्याचा विनाकारण अपप्रचार करू नये, असे आवाहनही यावेळी सुदीप ताम्हणकर यांनी केले. टॅक्सी बांधव आणि असोसिएशनचे पदाधिकारी ऊपेश कुम्ररलकर, राजू नर्से, प्रदीप पटेकर, उद्देश धावस्कर, विश्वास नारोजी, राहुल कोलवाळकर, सत्यवान गडेकर, प्रकाश आंबेडकर, संदेश आदी उपस्थित होते.
ज्यांना टॅक्सी व्यवसायचा काही गंध नसलेले एका संघटनेचे प्रतिनिधी व अॅड. प्रसाद शहापूरकर, निवृत्त अधिकारी भास्कर नाऊलकर, उदय महाले यांनी यामध्ये लुडबुड करून लोकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन यावेळी सुदीप ताम्हणकर यांनी केले. सुदीप ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीतून मोपा विमानतळावर टॅक्सी स्टँड अधिसूचित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिले आणि त्यानुसार कार्यवाही झालेली आहे. ही कारवाई कुठेतरी काही टॅक्सी बांधवांना खूपत असून ते विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका ऊपेश क्रुमरलकर यांनी केली काही दिवसात मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅन्ड अधिसूचित होणार आहे .आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेडण्यातील टॅक्सी व्यवसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. काही माणसं या विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांना पेडण्यातील टॅक्सी बांधवांना सर्व माहीत असून यापुढे त्यांनी असा प्रकार करू नये, असे आवाहन यावेळी राजू नर्से यांनी केले.









