Weight Loss Tips : आज व्यायामाला सुरुवात करूया असं मनात विचार येतो पण तो आज काही यशस्वी होत नाही. कामाच्या वेळा,जेवणाच्या काही वाईट सवयी यामुळे झोपायला उशीर होतो. मग उठायलाही उशीर होतो. यात व्यायाम राहून जातो. परत वजन वाढतं आणि मनाचा ताणही वाढतो. यासाठी दैनंदिन असणाऱ्या काही सवयीमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल आणि यासाठी वेगळा असा वेळ काढावा लागणार नाही. आज तुम्हाला अशा ४ टिप्स सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
जेवणाआधी १ ग्लास पाणी प्या
आपण जेवताना खूप पाणी पित असतो. याएेवजी जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी १ ग्लास पाणी प्या. यामुळे तुमचं पोटही भरल्यासारख होईल आणि शरीराला आवश्यक तेवढंच जेवण तुम्हाला जाईल. याचबरोबर नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण या व्यतिरिक्त जेव्हा भूक लागले असे वाटते तेव्हा पाणी प्या. जर पाणी पिल्याने भूक कंट्रोल होत असेल तर काहीही खाऊ नका. पाणी पिऊनही जर भूक जाणवली तरचं खा.
भूक लागल्यावरच जेवा
अनेकांना सतत खायची सवय असते. घरात इकडे- तिकडे फेऱ्या मारताना काही ना काहीतरी तोंडात टाकायची सवय असते. ही सवय बंद करा. जेव्हा भूक लागेल तेव्हाच खावा.
जेवणाची सुरुवात सुपने किंवा सॅलेडने करा
जेवणाची सुरुवात जे आवडत नाही त्याने करा. यासाठी सूप, सॅलेड किंवा डाळ आधी खा. ज्याने फायबर आणि प्रोटीन आधीचं पोटात जाईल. यामुळे अन्नही पोटात जादा जाणार नाही. यामळे पोटावरील चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होईल. याशिवाय एक वाटी दही किंवा ताक प्या. याने पोट भरेल आणि जादाचं अन्न पोटात जाणार नाही.
पोटभर जेवू नका
जेवताना पोटभर जेवू नका. पोट थोडं रिकामे ठेवा. जेवताना ८० टक्के पोट भरेल एवढेचं जेवा. बऱ्याचदा पोट भरतं पण मनं भरत नाही. अशावेळी पोटाचं एेका मनाचं एेकू नका.
टीप- यासोबतच थोडा व्यायाम करा. तुम्ही जीममध्ये जाऊनच व्यायाम करावा अस नाही. यासाठी जेवणाआधी १५ आणि जेवणानंतर १५ मिनिटे चाला. याचाही चांगला फायदा होतो.
Previous Articleरिक्षाचालकाचे नशीब रातोरात बदलले! २५ कोटींची लागली लॉटरी
Next Article घरच्या मसाल्यांनी बनवा चविष्ट वांगी भात









