इस्लामाबाद :
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च्या देशाच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. सैन्याने देशाच्या राजकीय व्यवस्थेला ओलीस ठेवले आहे. सैन्याने न्यायपालिकेचे स्वातंत्र्यही दडपले आहे. पाकिस्तानात जंगलराज असून येथे शक्तिशाली लोकांचे कुठलेच उत्तरदायित्व नसते. मी कधी पाकिस्तानी सैन्यासोबत तडजोड करणार नाही असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.









