Nana Patole Prakash Ambedkar भाजप (BJP) विरोधात जे आहेत त्या सगळ्या विरोधकांना सोबत घेऊन जाण्याचा प्रय़त्न आम्ही करत आहोत. सत्तेत देशाला उद्ध्वस्त करणारी व्यवस्था असून अराजकता माजली असल्याचे सांगून ती थांबवायची असेल तर भाजप विरोधात मोठी आघाडी निर्माण करावी लागेल. प्रकाश आंबेडकरांचा (Prakash Ambedkar) जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही असे मत कॉंग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.
या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव आमच्यासमोर येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलणार नसून आंबेडकरांची उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा सुरू आहे. मागिल निवडणुकीतील अनुभव पाहता त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय कॉंग्रेस कोणतीच भूमिका घेणार नाही. उद्धव ठाकरेंनाही प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करा आणि प्रस्ताव मागवा असे सांगितले आहे. कारण कुठेही धोका होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. कारण लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये असणाऱ्यांचा जो राग आहे तो एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत” असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








