ऑनलाईन टीम/तरुण भारत
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)ईडीने अटक केली आहे. राऊतांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai City Civil & Sessions Court) अर्ज केला आहे.याजामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. पण वेळेअभावी सुनावणी तहकूब करत पुढे ढकलली त्यामुळे संजय राऊतांना दिलासा मिळाला नाही.
दरम्यान, संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. आज मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने वेळे अभावी जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करत पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना आता १७ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीतच राहवे लागणार आहे.
गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ३१ जून रोजी अटक केली, यानंतर राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आल. दरम्यान मागील सुनावणीत ईडीने राऊतांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे वेळ मागितला, त्यानंतर कोर्टाने १० ऑक्टोबरपर्यंत राऊतांच्या कोठडीत वाढ केली. त्यानुसार आज राऊतांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात (PMLA) हजर करण्यात आले, आज राऊत यांचा जामीन अर्ज आणि नियमित सुनावणी एकाचवेळी झाली. दरम्यान न्यायालयाने वेळे अभावी ही सुनावणी वेळेअभावी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. यामुळे राऊतांच्या जामीन अर्जावर आता १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राऊतांना दिवाळीआधी तरी जामीन मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.