ऑनलाईन टीम/तरुण भारत
ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये (navi mumbai corporation) समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना काढण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने २५ वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेत समाविष्ट केलेली जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील (दहिसर मोरी भागातील) ती १४ गावे नंतर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे १५ वर्षांपूर्वी वगळण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. पण त्याच ग्रामस्थांच्या आग्रहाखातर अखेर ती १४ गावे मंगळवारी नवी मुंबई पालिकेत अधिकृतरीत्या समावेश करण्यात आली. तसा अध्यादेश नगरविकास विभागाने सोमवारी काढला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. याबाबत आता नगरविकास विभागानं अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. (NMMC 14 villages of thane taluka included in navi mumbai municipal corporation)
हे ही वाचा : राज्यातील खोके सरकारवर विश्वास नसल्यानेच वेदांता प्रोजेक्ट गुजरातला गेला; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहिर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या जाहिर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल.








