भारतात आणले जाणार पार्थिव
वृत्तसंस्था/ अंकारा
निजामाचे वंशज मुकर्रम जाह यांचे 14 जानेवारी रोजी तुर्कियेच्या इस्तंबुल शहरात निधन झाले आहे. जाह यांच्या कार्यालयाकडून रविवारी एका वक्तव्याद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. निधनासमयी जाह हे 89 वर्षांचे होते. जाह तुर्कियेतच वास्तव्याला होते. जाह यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव हैदराबादमध्ये आणले जाणार आहे. चौमहल्ला पॅलेस येथे पार्थिव नेण्यात येणार आहे, त्यानंतर आसफ जाही परिवाराच्या मकबऱयाच्या परिसरात दफनविधी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मुकर्रम हे आजम जाह बहादुर मीर उस्मान अली खान यांचे पुत्र होते. आजम जाह हे हैदराबाद संस्थानचे सातवे निजाम होते.









