सफवान पहिला उपविजेता, बेळगावचा विशाल चव्हाण दुसरा उपविजेता
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हासन येथे राजन्ना फिटनेस वर्ल्ड व कर्नाटक राज्य शरीरसौ÷व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने युवारत्न श्री किताबासाठी झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौ÷व स्पर्धेत उडुपीच्या नित्यानंद कोटीयान याने युवारत्न श्री हा मानाचा किताब पटकाविला. पहिले उपविजेतेपद दक्षिण कन्नडाच्या सुफवानने तर दुसरे उपविजेतेपद बेळगावच्या विशाल चव्हाणने पटकाविले.
हासन येथे सरकारी कला महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार सात वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
निकाल याप्रमाणे ः 75 किलो-1) आकाश निंगरानी बेळगाव, 2) विठ्ठल चव्हाण धारवाड, 3) दर्शन जी. चित्रदुर्ग 4) झेन दक्षिण कन्नडा, 5) पीरू नाईक शिमोगा, 60 किलो-1) उमेश गंगणे बेळगाव, 2) रामकुमार शिमोगा, 3) मुबारक हासन, 4) वेंकटेश गोविणकोप्पा, 65 किलो- 1) सोमशेखर कारवी उडुपी, 2) जिग्नेशकुमार हासन, 3) अराफात पाशा हासन 4) अब्दुल नुरसाद दक्षिण कन्नडा, 5) प्रथम पाटील बेळगाव. 70 किलो-1) शशिकुमार पी दावणगेरी, 2) प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, 3) शैलेश कुमार दक्षिण कन्नडा, 4) शोभित व्ही. हासन, 5) वेंकटेश ताशिलदार बेळगाव. 75 किलो-1) आनंद सुवर्णा उडुपी, 2) लोकेश गावडा हासन, 3) श्रवणन हरेराम, 4) गणेश बंगेरा दक्षिण कन्नडा, 5) कार्तिक कोडगु. 80 किलो-विशाल चक्हाण बेळगाव, 2) तापसकुमार नायक चित्रदुर्ग, 3) प्रसाद बाचीकर बेळगाव, 4) रेव्हनाथ व्ही. बेंगळूर, 5) मनोज हासन. 85 किलो-1) नित्यानंद कोटीयान उडुपी, 2) संदीप बंगेरा दक्षिण कन्नडा, 3) अविनाश केएसआरटीसी हासन, 4) किरण सी. आर. चिक्कमंगळूर. 85 किलोवरील गट- 1) सुफवान दक्षिण कन्नडा, 2) नवीन एम. बेंगळूर, 3) रूबल बेंगळूर, 4) चेतन के. एन. बेंगळूर, 5) मंजू शिमोगा.
त्यानंतर युवारत्न किताबासाठी उमेश गंगणे, आकाश निंगरानी, नित्यानंद कोटीयान, शशिकुमार, सोमशेखर, आनंद सुवर्ण, विशाल चव्हाण, सफवान यांच्यात लढत झाली. त्यामध्ये नित्यानंद कोटीयान, सुफवान व विशाल चक्हाण यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये नित्यानंद कोटीयानने युवारत्न श्री हा मानाचा किताब पटकाविला. पहिले उपविजेतेपद सुफवान तर दुसरे उपविजेतेपद विशाल चव्हाण यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या नित्यानंद कोटीयानला 50 हजार रूपये रोख, मानाचा किताब, प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून तर पहिल्या उपविजेत्या सुफवानला 30 हजार रूपये रोख प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून तर दुसऱया उपविजेत्या विशाल चव्हाणला 20 हजार रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी जे. डी. भट्ट, जे. निळकंठ, गंगाधर एम., वासुदेव साखळकर, उमामहेश आदींनी पंचांची भूमिका बजावली.









