वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे सुरू असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघातील युवा फलंदाज नितीशकुमार रेड्डी ने शानदार शतक नोंदवून संघाला बऱ्यापैकी सावरले. तो 105 धावांवर खेळत आहे. नितीशकुमार रेड्डीने कसोटी पदार्पणातच हे शतक नोंदविले आहे. नितीशकुमार रेड्डी r हा आंध्रप्रदेशचा क्रिकेटपटू असून त्याला आंध्रप्रदेश क्रिकेट संघटनेतर्फे 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या चौथ्या कसोटीत रेड्डीने वॉशिंग्टन सुंदर समवेत 127 धावांची शतकी भागिदारी केली आहे. नितीशकुमार रेड्डीच्या कामगिरीचे सुनील गावसकर यांनी खास कौतुक केले आहे.









