Nitish Kumar To Meet Sharad Pawar : विरोधकांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. आज नितिश कुमार यांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र सुप्रीम कोर्टातील निर्णयावर बोलणं त्यांनी टाळलं.
यावेळी बोलताना नितीश कुमार म्हणाले की, भाजप देशहिताच्या विरोधात काम करतंय.पवार विरोधकांचा चेहरा झाले, तर आनंद आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी हा दौरा आहे. देशपातळीवर हा दौरा करणार असल्याचे नितिश कुमार यांनी सांगितलं.यावेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर वाईट वाटलं.
उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना परत मुख्यमंत्रीपद देता आलं असतं असं कोर्टाने आज सांगितलं यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असेल असा सवाल त्यांना करताच शरद पवार म्हणाले, यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मला जे सांगायचे आहे ते ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात मी सविस्तर लिहलय असं म्हणत राजकीय घडामोडीवर बोलणं त्यांनी टाळलं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








