वृत्तसंस्था/ लंडन
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू नितीशकुमार रेड्डी याला रविवारी जिममध्ये व्यायाम करीत असताना गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला इंग्लंडचा दौरा अर्धवट सोडावा लागणार असल्याचे समजते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी मँचेस्टरमध्ये येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारतावर 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी सज्ज झाला असताना दुखापतग्रस्त खेळाडूंची डोकेदुखी निर्माण झाली आहे. वेगवान गोलंदाज आकाशदीप आणि अर्शदीप सिंग यांना दुखापत झाली असल्याने ते चौथ्या कसोटीत खेळू शकणार नसल्याचे यापूर्वीच घोषित करण्यात आले आहे. भारतीय संघामध्ये अनशुल कंबोजला अर्शदीप सिंगच्या जागी संधी देण्यात आली आहे. आता नितीशकुमार रेड्डीrच्या दुखापतीमुळे भारतीय संघासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. नितीशकुमार रेड्डीला दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत संधी देण्यात आली होती. पण त्याची कामगिरी विशेष परिणामकारक दिसली नाही. या मालिकेतील पहिल्या 3 कसोटींमध्ये भारताने अष्टपैलू वेगवान गोलंदाजांना अधिक संधी दिली होती. शार्दुल ठाकूरला पहिल्या कसोटीत खेळविण्यात आले होते. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. जर नितीशकुमार रे•ाr उपलब्ध होऊ शकला नाही तर शार्दुलचे संघात पुनरागमन होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.









