वादग्रस्त बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांनी केलेल्या बिहारमधून हिंदु राष्ट्राची आग प्रज्वलित केली जाईल असे वक्तव्य केल्यानंतर बिहारच्या राजकारण तापण्याची शक्यता आहे. बागेश्वर धाम यांच्या या वक्तव्या निंदा करत मुख्यमंत्र्यांनी चागंलाच समाचार घेतला असून हिंदु राष्ट्राबाबत अशी टिप्पणी करणारे लोक संविधानाची निर्मिती होत असताना जन्मालाही आले नसल्याची टिका केली.
वादग्रस्त असलेले आणि सोशल मीडीयावर चर्चेत असलेले बाबा बागेश्वर सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. बिहारच्या पाटणा येथे पाच दिवसांचा कार्यक्रम सुरु असून त्यांनी या कार्यक्रमात बोलताना, ते म्हणाले कि, “बिहारमधून हिंदु राष्ट्राची आग प्रज्वलित केली जाईल.” असे बोलून त्यांनी बिहारमधील आपल्या अनुयायांनी आवाहन केले.
बाबांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने टिका केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलय की, “भारताच्या स्वातंत्र्याचा लढा लढल्यानंतर देशाची राज्यघटना अस्तित्वात आली आहे. देशाचे हे नाव आपल्या सर्वांना मान्य असायला हवं. अशा प्रकारचे वक्तव्य करणारे स्वातंत्र्यलढ्यात जन्मले तरी होते का?… हे सांगायची काय गरज आहे? तुम्हाला कोणता धर्म हवा आहे त्याचे आचरण पाळा. पण देशाच्या नामांतराचे प्रस्ताव चकित करणारे आहेत. हे कधीच शक्य नाही? अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांनी एकदा संविधान समजून घेतले पाहिजे,” असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
बिहारच्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्य सरकार कुठल्याही धर्माच्या श्रद्धेमध्ये हस्तक्षेप करत नाही. राज्यात प्रत्येकाला त्यांच्या इच्छेनुसार उपासना करण्याचा अधिकार मिळत असल्याची खात्री दिली आहे.








