वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाटणा विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान खाली कोसळले आहेत. खाली कोसळलेल्या नितीश कुमार यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सावरून त्यांना उभे केले. या घटनेवेळी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर देखील उपस्थित होते. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेत सुदैवाने नितीश कुमारांना कुठलीच ईजा झालेली नाही. विद्यापीठातील नव्या सिनेट हॉलचे उद्घाटन करताना नितीश कुमार हे पाय घसरून खाली पडले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी नितीश कुमार यांना सावरले. या घटनेनंतर नितीश कुमार यांनी कार्यक्रमात भाग घेत उपस्थितांना संबोधितही केले आहे. पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. जयप्रकाश नारायण यांनी येथूनच चळवळ सुरू केली होती. त्यावेळी देशविदेशातून लोक येथे येत होते. आम्हाला या जागेबद्दल अत्यंत आत्मियता आहे. या विद्यापीठाला राष्ट्रीय मान्यता मिळावी अशी आमची इच्छा असल्याचे नितीश यांनी म्हटले आहे.









